प्रशालेत भारताचा ७० वा प्रजासत्ताक दिन साजरा .......

२६ जानेवारी २०१९ शनिवार......

प्रशालेत भारताचा ७० वा प्रजासत्ताक दिन साजरा झाला, त्यासोबत दरवर्षीप्रमाणे इ. १२ वी च्या विद्यार्थिनींचा दीक्षांत समारंभ आयोजित केला गेला.

सकाळी  ७.३० वा. महाराष्ट्रराज्याचे शिक्षण आयुक्त माननीय श्री. विशालजी सोळंकी, म.ए.सो. नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीवजी सहस्त्रबुध्दे,

शालासमिती अध्यक्षा डॉ. माधवी मेहंदळे,  महामात्रा सौ. चित्रानगरकर, शालासमिती सदस्य श्री.बाबासाहेब शिंदे आणि श्री. सतिश कुलकर्णी यांनी शौर्याचे

प्रतिक असणा-या व सैनिकी प्रशालेस प्रेरणा देणा-या राणी लक्ष्मीबाईच्या पुतळ्यास अभिवादन केले. यानंतर ७.४५ वा. मान्यवरांचे मैदानावर आगमन

झाले आणि प्रमुख पाहुणे आयएएस अधिकारी श्री. विशाल सोळंकी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

राष्ट्रगीत झाल्यानंतर मान्यवरांनी पथकांचे निरीक्षण केले. प्रशालेच्या कर्णधार पदी असलेल्या कॅडेट ऋतुजा घाडगे हिने पथकांचे नेतृत्व केले. घोषपथकाच्या

तालावर पथकांनी शानदार संचलन करत मान्यवरांना सलामी दिली. प्रमुख अतिथी श्री.विशाल सोळंकी यांनी आपल्या मनोगतात, भारत माझा देश आहे ही

प्रतिज्ञा व प्रतिज्ञेचा खरा अर्थ प्रत्यक्ष कृतीत आणाल असा विश्वास वाटतो असे सांगितले. सैनिकी शाळेच्या मुलींचे कौतुक करुन भविष्यात सक्षम महिला

अधिकारी घडतील व भूषणावह प्रगती करतील असा विश्वास व्यक्त करत पुढच्या कारकीर्दिसाठी कॅडेटस्ना शुभेच्छा दिल्या तसेच पालक व सैनिकी परिवाराचे

अभिनंदन केले.

सैनिकी प्रशाले तर्फे इ.१२ वी च्या विद्यार्थिनींच्या दीक्षांत समारंभा निमित्त कॅडेटस्ना सैन्य प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र म.ए.सो. नियामक मंडळाचे

अध्यक्ष श्री. राजीवजी सहस्त्रबुध्दे आणि शाला समिती अध्यक्षा डॉ. माधवी मेहंदळेयांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

यावर्षी सैनिकी प्रशालेची १५ वी तुकडी सैन्य प्रशिक्षण घेऊन बाहेर पडत आहे. कार्यक्रमातील संचलनाचे सूत्रसंचालन कॅडेट रिया देशपांडे व कॅडेट साची खोब्रागडे

यांनी केले.

कार्यक्रमाच्या मध्यंतरात मान्यवरांनी प्रशाला इमारतीतील अटल टिंकरिंग लॅब आणि शकुंतलादेवी गणित प्रयोगशाळेस भेट दिली, यावेळी विद्यार्थिनींसोबत

प्रश्नोत्तरस्वरुपात चर्चा केली.

कार्यक्रमाच्या दुस-या सत्रात, प्रशालेतील विद्यार्थिनींनी अत्यंत सुरेल आवाजात "एवतन....." हे स्वागतगीत सादर केले,

या गीतासाठी सौ. देविका काशीकर यांनी मार्गदर्शन केले.

भारतीय लष्कराला गौरवशाली इतिहास आहे.

भारतीय लष्कराकडून १५ जानेवारी हा दिवस सैन्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

या पार्श्वभूमीवर भारतीय जवानांना त्यांच्या कार्याला सलामी देण्यासाठी प्रशालेतील विद्यार्थिनींनी विविध प्रात्यक्षिके सादर केली.

यामध्ये शरीराची लवचिकता दाखविणारी जिम्नॅस्टिक्‍स, रोप क्लाइंबिंग, रोप मल्लखांब व योगा (मार्गदर्शक - हनुमंत आंबाटी, कमांडंट कर्नल सारंग काशीकर, शिवानी

कुलकर्णी, उमा जोशी), साहसी व धाडसी वृत्ती वाढविणारी घोडेस्वारी (मार्गदर्शक - श्री. गुणेश पुरंदरे), वादनाच्या तालावर शिस्तबध्द पावले टाकणारी रचना साकारणारा

घोष पथक (मार्गदर्शक - श्री. मयूर सगरी), दोन्ही हातात धरलेल्या निशाणांच्या साहाय्याने विशिष्ट प्रकारे हालचाल करून मुळाक्षरे सुचवणे व त्याद्वारे संदेश पोचवणे

अशी नौसेने मध्ये वापरली जाणारी संप्रेषण प्रणाली Semaphore (मार्गदर्शक - सौ. राजश्री गोफणे), आत्मविश्‍वास आणि निर्भीडपणा दाखविणा-या आगीच्या रिंगमधून

उड्या मारणे fire jump (मार्गदर्शक - श्री. संदीप पवार, श्री.राजू दाभाडे), मानसिक एकाग्रता व तीक्ष्ण दृष्टी दर्शविणारी नेमबाजी आणि धनुर्विद्या (मार्गदर्शक -

श्री.चंद्रकांत बनसोडे, श्री. अजय सोनावणे), Bayonet fighting  (मार्गदर्शक - श्री. गजानन माळी), कराटे (मार्गदर्शक - श्री. विक्रम मराठे),

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन करणारा भगवा ध्वज, ढोल-ताशासह खेळला जाणारा खेळ लेझीम (मार्गदर्शक - श्री. विश्वास गुरव)

अशी विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन कमांडंट कर्नल सारंग काशीकर यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षण निदेशक श्री. चंद्रकांत बनसोडे,

क्रीडाविभाग प्रमुख श्री. संदीप पवार यांनी केले होते. प्रशालेतील * सैन्यप्रशिक्षण विभाग व क्रीडाविभागाने * यासाठी विशेष तयारी केली होती.

कार्यक्रमातील प्रात्यक्षिकांचे सूत्रसंचालन कॅडेट अनुष्का सामंत व कॅडेट समिक्षा शेंडे यांनी केले.

कार्यक्रमातील प्रात्यक्षिकांचे परीक्षण श्री. प्रमोद झुरमुरे व सौ. वैशाली शिंदे यांनी केले. रचना, शिस्त, नाविन्य, वेळ, सुसूत्रता,

विद्यार्थिनींची संख्या या निकषांच्या आधारे प्रात्यक्षिकांचे परीक्षणकरण्यात आले. त्यानुसार रोपमल्लखांब या प्रात्यक्षिकास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.

 कार्यक्रम पाहण्यासाठी माजी विद्यार्थिनी व पालकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती नोंदविली. विद्यार्थिनींच्या कसरतींना सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

सर्वच प्रकारातील प्रात्यक्षिकांनी मैदानावरील प्रत्येक जण भारावून गेला.

कार्यक्रमातील विविध व्यवस्थांचे व्यवस्थापन उत्तमरित्या पार पाडण्यासाठी इ. १२ वीचे वर्गशिक्षक सौ. सावित्री पाटील आणि श्री. महेश कोतकर, श्री. चंद्रकांत बनसोडे -

संचलन, श्री. गजानन माळी – प्रात्यक्षिके, सौ. रेखा रायपूरकर - प्रशाला इमारत, श्री. सुनिल डुबोले – भोजनालय व श्री. समीर जाधव – परिसर नियोजन यांनी पाहिले.

रविराज थोरात, साईनाथ जगदाळे, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, उपमुख्याध्यापक श्री. अनंत कुलकर्णी व कमांडंट कर्नल सारंग काशीकर यांनी विशेष योगदान दिले.

प्रशालेतील सर्व सैनिकी परिवाराने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कष्ट घेतले.

कनिष्ठ महाविद्यालयाला जोडून वरीष्ठ महाविद्यालय सुरूकरण्यासाठी संस्थेने लवकरात लवकर प्रयत्न करावेत,

त्यासाठीचे सहकार्य देण्याचे आश्वासन प्रमुख पाहुणे श्री. विशालजी सोळंकी यांनी दिले तसेच म.ए.सो. ने हा शिवधनुष्य नुसता पेलला नसून शिक्षण क्षेत्रात आदर्श सैनिकी

प्रशालेच्या स्वरुपात पारंगत केला आहे. एका दिपस्तंभाप्रमाणे हीप्रशाला सर्वांना प्रेरणा देत राहील हे गौरवोद्गार काढले.

सदर कार्यक्रम ७.३० ते ११.३० यावेळात सुरू होता. सर्व मान्यवर पूर्ण वेळ कार्यक्रमास  उपस्थित होते. महाराष्ट्र व गुजरात मधील पालक कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

        

JoomShaper