आंतरशालेय नाट्यस्पर्ध्येत मुलींच्या सैनिकी शाळेचे नावलौकिक

आंतरशालेयनाट्यस्पर्ध्येत मुलींच्या सैनिकी शाळेचे नावलौकिक

      दि. १० एप्रिल २०१९ बुधवार रोजी प्रेरणा माध्यमिक विद्यालय, निगडी येथे पुणेजिल्हा-परिषदवयशवंतरावचव्हाणजिल्हास्तरीयआंतरशालेयनाट्यस्पर्ध्येचे पारितोषिक वितरण समारंभ झाला. सदर समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मराठी सिनेमा सृष्टीतील कलाकार सौ. आशा काळे, तसेच मा. डॉ. गणपतराव मोरे. शिक्षणाधिकारी, माध्यमिक-विभाग जि.प.पुणे.,श्री. हनुमंत कुबडे, कार्याध्यक्ष यशवंतराव चव्हाण बालनाट्यस्पर्धाहे उपस्थित होते.

      सदर कार्यक्रमात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची राणी लक्षीबाई मुलींची सैनिकी शाळेतील जिल्हास्तरावर सादर केलेले हिंदी व इंग्रजी भाषेतीलनाटकातील कलाकारांना सन्मानित करण्यात आले. सादर केलेले हिंदी नाटक ‘जीवन अनमोल है’ ह्या नाटकाला जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळाला व कु. यशश्री शंकर उणेचा हिला जिल्हास्तर उत्कृष्ट कलाकाराचे पारितोषिक मिळाले . तसेच सदर नाटकाचे दिग्दर्शन व लेखन सौ. सुषमा गजानन पाटील यांनी केले होते. त्यांनाही उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. इंग्रजी नाटक ‘ The Hidden Treasure’ याचे लेखन व दिग्दर्शन श्री. गजानन पाटील यांनी केले होते. त्या नाटकातील कु. अनुष्का सामंत हिला जिल्हास्तरावर उत्कृष्ट कलाकाराचे पारितोषिक मिळाले .

      सदर यशाबद्दल प्रशालेच्या प्राचार्या सौ. जयश्री शिंदे, उपमुख्याध्यापक श्री अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे ,श्री संदीप पवार  व इतर सैनिकी परिवार यांनी कौतुक केले. तसेच या यशाबद्दलम.ए.सो.व शाळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदनकेले.

     

 

 

JoomShaper