महाकवी कालिदास जयंतीनिमित्त संस्कृत दिनोत्सव साजरा

 

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची,

राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा,

कासार आंबोली, ता. मुळशी, जि. पुणे.

महाकवी कालिदास जयंतीनिमित्त संस्कृत दिनोत्सव साजरा

संस्कृतं ये प्रशंसन्ति ये प्रशंसन्ति संस्कृतिम्

स्वदेशं ये च शंसन्ति धन्यं जीवन्ति ते नरा:।।

        बुधवार दि.०३ जुलै २०१९ रोजी महाकवी कालिदास जयंती आणि संस्कृत दिनानिमित्त प्रशालेत विद्यार्थिनींनी संस्कृत भाषेतुन परिपाठ सादर केला.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली, त्यानंतर प्रतिज्ञा व भारतीय संविधानाचे प्रास्ताविक संस्कृत भाषेतुन म्हटले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाकवी कालिदासांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रतिमा पूजनावेळी श्री.भाऊसाहेब मार्तंड सर यांनी संस्कृत स्तोत्र गायन केले.

          इ. १२ वी च्या विद्यार्थिनींनी आजचे दिनविशेष, सुभाषित व बोधकथा संस्कृत भाषेमध्ये सादर केले, संस्कृत वाक्यांचे मराठी भाषांतर करुन सादरीकरण अतिशय स्पष्ट आवाजात केले.तसेच संस्कृत भाषेचे महत्त्व व महाकवी कालिदासांच्या जीवनाविषयी माहिती देखील अतिशय सुरेख रितीने सांगितली. या सादरीकरणाचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे सादरीकरणातील विद्यार्थिनींचे आवाजाचे स्पष्ट-शुध्द उच्चार, मोठा आवाज आणि आत्मविश्वास होय.तसेच प्रशालेतील इ. ८ वी च्या विद्यार्थिनींनी महाकवी कालीदास गीत सादर केले.याप्रसंगी सर्व शिक्षकांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.

          कार्यक्रमालाउपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी सर, पर्यवेक्षक श्री. शाम नांगरे सर,पर्यवेक्षक श्री. संदिप पवार सरतसेच प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाला प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती जयश्री शिंदे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृत विभागाचे प्रमुख श्री. साईनाथ जगदाळे यांनी केले.माहिती सांगत असताना त्यामध्ये विविध श्लोकांचे दाखले सरांनी दिले. ते पुढीलप्रमाणे -

कालिदास जयंती

आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं

वप्रक्रिडापरिणत गजप्रेक्षणीयं ददर्श ।। मेघदूत।।

पुरा कवीनां गणनाप्रसंगे

कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासा:।

अद्यsपि तत्ततुल्यकवेरभावात्

अनामिका सार्थवती बभूव।।

          या श्लोकांतुन आजच्या दिनाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.

त्यांनी विद्यार्थिनींनी जास्तीत जास्त संस्कृतच्या वाङ्मयांचा अभ्यास करावा, असे आवाहन केले. त्याप्रमाणे संस्कृत भाषेचा अभ्यास करुन आपली संस्कृती टिकवावी, अशा शुभेच्छा यावेळी देऊन कार्यक्रमाचा शेवट महाकवी कालिदास गीताने झाला.

 

https://youtu.be/he47WLtMQIY

 

|| जयतु संस्कृतं  पठतु संस्कृतम् ||

 

-संस्कृत विभाग

(श्री. साईनाथ जगदाळे)

 

JoomShaper